HSC Result : राज्यात ४८ महाविद्यालयांचा कला व विज्ञान शाखेचा निकाल शून्य

यंदा विज्ञान शाखेची परीक्षा ६ लाख ४९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ६ लाख २४ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

HSC Result : राज्यात ४८ महाविद्यालयांचा कला व विज्ञान शाखेचा निकाल शून्य
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

HSC Result Update : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा विज्ञान शाखेचा (Science Stream Result) निकाल सर्वाधिक ९६.०९ टक्के इतका लागला आहे. तर वाणिज्य शाखेचा (Commerce Stream Result) ९०.४२ टक्के आणि कला शाखेचा (Art Stream Result) ८४.०५ टक्के इतका आहे. या निकालात ३१ कनिष्ठ महाविद्यालयांचा कला शाखेचा तर १७ कनिष्ठ महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. तर तब्बल २ हजार ३६९ महाविद्यालयांचा विज्ञानाचा निकाल शंभर टक्के आहे. कला शाखेच्या ७७५ महाविद्यालयांनी शंभरी गाठली आहे. (Maharashtra HSC Result)

यंदा विज्ञान शाखेची परीक्षा ६ लाख ४९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ६ लाख २४ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील जवळपास सहा हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये सर्वाधिक १ हजार ५६ महाविद्यालये पुणे विभागातील तर सर्वात कमी १०७ महाविद्यालये कोकण विभागातील आहेत.

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के; यंदाही मुलींची बाजी

एकूण निकालात १७ महाविद्यालयांतील एकही विद्यार्थी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेला नाही. तर ५० टक्केहून कमी निकाल लागलेली महाविद्यालये ३६ एवढी आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांचा आकडाही मोठा आहे. तब्बल २ हजार ३६९ महाविद्यालयांनी शंभरी गाठली आहे. तर जवळपास तीन हजार महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल ९०.०१ ते ९९.९९ टक्के एवढा लागला आहे. हे प्रमाण जवळपास ५० टक्के एवढा आहे.

बारावीच्या निकालात मुंबई तळात; कोकण पुन्हा अव्वल तर पुणे दुसऱ्या स्थानावर

कला शाखेतून परीक्षा दिलेल्या एकूण ३ लाख ८७ हजार २८५ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २५ हजार ५४५ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील एकूण ६ हजार ६७९ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३१ महाविद्यालयांचा निकाल शुन्य टक्के लागला असून त्यापैकी सर्वाधिक ११ महाविद्यालये औरंगाबाद विभागातील आहेत. तर ७७५ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के असून ५० टक्केपेक्षा कमी निकाल असलेली महाविद्यालये ३०६ आहेत. ९० ते ९९ टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांचे प्रमाण सर्वाधिक २ हजार १५५ एवढे आहे.  

दरम्यान, वाणिज्य शाखेच्या ३ लाख ३५ हजार ८०४ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ३ हजार ६५६ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. व्यवसाय अभ्यासक्रमातून ३५ हजार ९४८ तर आयटीआयचे २ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या दोन शाखांचा निकाल अनुक्रमे ८९.२५ टक्के आणि ९०.८४ टक्के एवढा आहे.

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2