NEET PG 2024 : परीक्षेची तारीख दोन दिवसांत जाहीर होणार; धर्मेंद्र प्रधान यांची माहिती 

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (पोस्ट ग्रॅज्युएट) ची नवीन तारीख नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) येत्या दोन दिवसांत जाहीर करेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

NEET PG 2024 : परीक्षेची तारीख दोन दिवसांत जाहीर होणार; धर्मेंद्र प्रधान यांची माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG परीक्षेस (NEET PG Exam 2024) प्राविष्ट झालेल्या उमेदवारांसाठी नवी अपडेट आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (पोस्ट ग्रॅज्युएट) ची नवीन तारीख नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) येत्या दोन दिवसांत जाहीर करणार आहे, (Exam date will be announced in two days), अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

मागील आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक आढावा बैठक झाली. ज्यामध्ये आधीच सांगितले गेले होते की परीक्षेच्या तारखेची माहिती पुढील आठवड्यापर्यंत प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे या आठवड्यात आज किंवा उद्या नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

NEET PG परीक्षा 23 जून रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. परंतु, परीक्षेच्या तारखेच्या 12 तास आधी ती पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने CSIR UGC NET, UGC NET आणि राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (NCET 2024) साठी नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. अधिसूचनेनुसार, CSIR UGC NET परीक्षा 25 ते 27 जुलै 2024 या कालावधीत घेतली जाईल आणि UGC NET ची पुनर्परीक्षा 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल. या व्यतिरिक्त NCET परीक्षा 10 जुलै 2024 रोजी घेतली जाईल.

या सर्व परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी  उमेदवारांचे हॉल तिकीट परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी पुन्हा उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.