CBSE result : आर्य गुरुकुल शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

कल्याणच्या  आर्य गुरुकुलमधील प्रणव गोरे या विद्यार्थ्याने दहावीत ९९ टक्के गुण मिळवत शाळेत अव्वल क्रमांक पटकावला . तर कौस्तुभ दुबे या विद्यार्थ्याने बारावीत  ९६.२ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.

CBSE result : आर्य गुरुकुल शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी- बारावीच्या च्या परीक्षेचा निकाल 10th and 12 th exam result जाहीर होताच कल्याणच्या  नांदिवली येथील आर्य गुरुकुल arya gurukul kalyan शाळेत एकच जल्लोष पाहायला मिळाला. या शाळेचा सीबीईएसईचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील प्रणव गोरे या विद्यार्थ्याने दहावीत ९९ टक्के गुण मिळवत शाळेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर कौस्तुभ दुबे या विद्यार्थ्याने बारावीत  ९६.२ टक्के गुण मिळवले.  

    प्रणव गोरे याने आपल्या कामगिरीचे श्रेय त्याच्या शिक्षकांना दिले आहेत. तो म्हणाला, " शिक्षकांनी अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन केले आणि बारकाईने प्रशिक्षण दिले.आमच्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला सर्व प्रकारे मार्गदर्शन केले. संभाव्य प्रश्नांची देवाणघेवाण आणि समुपदेशनापर्यंत सर्व गोष्टीत सहकार्य केले. माझ्या वर्गमित्रांना आणि मला सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे,यासाठी माझे शिक्षक प्रत्येक टप्प्यावर आमच्याबरोबर होते.