UGC NET : नेट परीक्षेसाठी नोंदणीला सुरूवात, असा भरा अर्ज

देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा दि. ६ ते २२ डिसेंबर याकालावधीत घेण्याचे नियोजित आहे.

UGC NET : नेट परीक्षेसाठी नोंदणीला सुरूवात, असा भरा अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET) या डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या  परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.  इच्छुक उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांना दि. २९ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. 

 

 

देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा दि. ६ ते २२ डिसेंबर याकालावधीत घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. एनटीएकडून त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार २८ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल. तर २९ ऑक्टोबर ही शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे. अर्जामध्ये दुरुस्तीसाठी ३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा केंद्राचे शहराची माहिती जाहीर केली जाईल.

SPPU News : दूरस्थ अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ, प्रवेशात मोठी घट

 

खुल्या वर्गातील  उमेदवारांना १ हजार १५० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. तर EWS आणि OBC-NCL साठी  ६०० रुपये आणि एससी, एसटी  व  PwD साठी नोंदणी शुल्क ३२५ रुपये असेल. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष परीक्षेत ५५ टक्के  गुण प्राप्त केलेले असावेत. SC, ST, PWD आणि OBC-NCL प्रवर्गातील उमेदवारांकडे ५० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पीएचडी पदवी घेतलेल्या आणि पदव्युत्तर परीक्षा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट दिली जाईल.

 

ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर परीक्षेचे अंतिम वर्ष पूर्ण केले आहे किंवा जे त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत ते देखील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. तथापि, ज्युनियर रिसर्च फेलोशिप/ सहाय्यक प्राध्यापक पात्रतेसाठी पात्र मानले जाण्यासाठी, उमेदवारांनी त्यांची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी, अशी सूचना UGC कडून देण्यात आली आहे. UGC NET मध्ये  संगणक आधारित दोन  चाचण्या असतील.

 

असा करता येईल अर्ज 

* अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in. भेट द्या  

* अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

* स्वतःची नोंदणी करा आणि क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.

* अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

* परीक्षा शुल्क भरा.

* पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j