विद्यापीठाला निकालाची घाई;  वेळेत केला बदल अन् प्राध्यापक झाले सैरभैर

उत्तरपत्रिका तपासून विद्यापीठाकडे येत्या २० जुलैपर्यंत गुण भरण्यास मुदत दिली आहे. परंतु, शुक्रवारी अचानक ही मुदत १४ जुलै करण्यात आली. त्यामुळे संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचा चांगलाच गोंधळ उडाला.

विद्यापीठाला निकालाची घाई;  वेळेत केला बदल अन् प्राध्यापक झाले सैरभैर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Minister of Higher and Technical Education of Maharashtra) यांनी दिले होत्या. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा उशिरा संपल्या. त्यामुळे निकाल (rusult ) जाहीर  करण्यास विलंब होत आहे. मात्र याचा ताण विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील (exam department) अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांवर पडत आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात ५० हजार शिक्षकांची भरती : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

 राज्यातील व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, राज्यातील अनेक विद्यापीठांचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला नाही. त्यामुळे विधी अभ्यासक्रमासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशास विलंब होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर्षी द्वितीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लवकरात लवकर तपासून व्हाव्यात यासाठी कॅप सेंटरची संख्या वाढवली आहे . उत्तरपत्रिका तपासून विद्यापीठाकडे येत्या २० जुलैपर्यंत गुण भरण्यास मुदत दिली आहे. परंतु, शुक्रवारी अचानक ही मुदत १४ जुलै करण्यात आली. त्यामुळे संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचा गोंधळ उडाला.एवढ्या कमी कालावधीत गुण भरणे शक्य नव्हते. त्यामुळे काय करावे हे प्राध्यापकांना सुचत नव्हते. 

हेही वाचा: अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठीतून करण्याला प्राधान्य : चंद्रकांत पाटील

पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांची पालखी दाखल होणार असल्याने विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे काही विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वीच काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे काही प्राध्यापकांकडून अद्याप या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या नाहीत. त्यात अचानक १४ जुलै पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासून या विद्यार्थ्यांची गुण विद्यापीठाच्या ऑनलाइन यंत्रणेमध्ये सबमिट करा, अशा सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्याने प्राध्यापकांचा चांगलाच गोंधळ उडाला. 

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अचानक गुण जमा करण्याच्या तारखेत बदल केल्यामुळे संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे याबाबत चर्चा केली. एक किंवा दोन दिवसांपूर्वी संपलेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून संबंधित विषयांचे गुण जमा करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने २० जुलैपर्यंत अवधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाने पुन्हा तारखेत बदल केला.