CUET UG २०२३ परीक्षेचा  निकाल अखेर  जाहीर 

परीक्षेचा निकाल NTA CUET च्या अधिकृत साईटवर cuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर  पाहता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डल वरून ही माहिती दिली आहे.

CUET UG २०२३  परीक्षेचा  निकाल अखेर  जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ( CUET UG २०२३ ) चा  निकाल अखेर जाहीर झाला आहे. त्यामुळे  विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता  संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  (NTA ) काही वेळापूर्वी   CUET UG  २०२३ चा निकाल  जाहीर केला आहे. परीक्षेचा निकाल NTA CUET च्या अधिकृत साईटवर cuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर  पाहता येईल. तसेच  विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डल वरून ही माहिती दिली आहे.
      केंद्रीय,राज्य, अभिमत  आणि इतर सहभागी खाजगी विद्यापीठे व स्वायत्त संस्थांच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील CUET UG प्रवेश परीक्षा गेल्या वर्षी म्हणजे २०२२ पासून सुरु करण्यात आल्या होत्या. यावर्षी CUET UG परीक्षेला  सुमारे १४ लाख, ९० हजार  उमेदवारांनी नोंदणी केली होती तर १३ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.उमेदवारांना २९ जून ते १ जुलै या कालावधीत आन्सर  की ला  आव्हान करण्याची परवानगी देण्यात आली होती. सुमारे २५ हजार ७८२ आव्हाने प्राप्त झाली होती. NTA ने काही दिवसांसाठी दररोज रात्री सुधारित तात्पुरती उत्तरे  प्रसिध्द केली होती.  

असा पहा निकाल 


* अधिकृत वेबसाइट- cuet.samarth.ac.in वर जावे 
* होम पेजवर उपलब्ध असलेल्या CUET UG Result 2023 लिंकवर क्लिक करा.
*  आवश्यक माहिती  प्रविष्ट करा  आणि सबमिट करा 
*   तुमचा CUET UG निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
*  तो निकाल  डाउनलोड करा  प्रिंटआउट घ्या.