UGC च्या निर्णयावरून संभ्रम; सहाय्यक प्राध्यापक पात्रतेबाबत करावा लागला खुलासा

विद्यापीठांमधील विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आतापर्यंत पीएचडी पदवी बंधनकारक होती. या निर्णयामुळे सेट (SET), नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी मिळणार आहे.

UGC च्या निर्णयावरून संभ्रम; सहाय्यक प्राध्यापक पात्रतेबाबत करावा लागला खुलासा
UGC Clarification

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या (Assistant Professor) नियुक्तीसाठी किमान पात्रता ही NET/SET/SLET निश्चित करण्यात आली आहे. त्यावरून पीएचडी पात्रताधारकांसह मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. आता पीएचडी प्राप्त उमेदवारांनाही नेट, सेट उत्तीर्ण व्हावे लागेल का, याबाबत अनिश्चितता होती. त्यानंतर आयोगाने पत्रक काढून याबाबत खुलासा केला आहे.  

विद्यापीठांमधील विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आतापर्यंत पीएचडी पदवी बंधनकारक होती. या निर्णयामुळे सेट (SET), नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. युजीसीकडून सहायक प्राध्यापक पदासाठी केवळ किमान पात्रता सेट, नेट केली असून इतर कोणत्याही नियमांत बदल केलेला नाही. पण अनेकांनी या निर्णयानंतर नाराजीही व्यक्त केली आहे.

UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम; ‘पीएचडी’वर फुली

संभ्रम दूर करण्यासाठी UGC ने गुरूवारी पत्रक जारी केले आहे. ३० जुलै रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार UGC ने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी  किमान पात्रता  NET/SET/SLET केली. तर आता सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी उमेदवारांना पीएच.डी. किंवा NET/SET/SLET  या दोन पैकी एक पात्रता ग्राह्य धरली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीएचडी पदवी घेतलेल्या उमेदवारांना नेट/सेट/एसएलईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नाही. असे उमेदवार सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी थेट अर्ज करण्यास पात्र ठरतील. त्यांना नेट, सेटमधून सवलत सुट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी आवश्यक असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD