SPPU News : व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांसाठी २५ ऑक्टोबरला निवडणूक

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान निवडणूक पार पडेल.

SPPU News : व्यवस्थापन परिषदेच्या दोन सदस्यांसाठी २५ ऑक्टोबरला निवडणूक
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) व्यवस्थापन परिषद (Management Council) या अधिकार मंडळावर दोन सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्या परिषदेतील (Academic Council) सदस्यांमधून या दोन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यामध्ये एक अध्यापक व दुसरा सदस्य महिला असेल. त्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. (Savitribai Phule Pune University News)

 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Dr. Prafulla Pawar) यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान निवडणूक पार पडेल. त्यासाठी दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक अर्ज सादर करावा लागेल. तर दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होईल. दि. १८ ऑक्टोब रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.

आश्रमशाळांना वस्तूंचा पुरवठा बंद होणार; विद्यार्थ्यांनाच मिळणार पैसे

 

दि. २५ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार निवडणूक होईल. मतदानासाठी एक तासांचा कालावधी देण्यात आला आहे. मतदान संपल्यानंतर लगेचे मतमोजणी पार पडेल. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहामध्ये मतदान होणार आहे. दरम्यान, विद्यापरिषद सदस्य म्हणून मतदानाच्या अंतिम दिनांकापर्यंत रिक्त असलेल्या जागेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेल्या व्यक्तीस मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

 

निवडणुकीसाठी मतदानावेळी विद्या परिषदेचे सदस्य असलेल्या सदस्यांपैकी ज्या संविधानिक अधिकारी, अधिष्ठाता यांच्याकडे सदर पदाचा प्रभारी किंवा अतिरिक्त कार्यभार आहे, तसेच जे तदर्थ अध्यक्ष अथवा तदर्थ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत, अशा सदस्यांना मतदान करता येणार नाही. या निवडणुकीसाठी मतदान हे पसंतीनुसार प्राधान्यक्रम या पध्दतीने करावयाचे आहे.   

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k