दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक; उरले फक्त २७ दिवस

लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक; उरले फक्त २७ दिवस
SSC, HSC Supplementary Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

SSC-HSC Exam Timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै - ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे (Supplementary Exam) सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार असून इय़त्ता दहावीचा पहिला पेपर मराठीचा तर बारावीचा इंग्रजी विषयाचा आहे. (SSC-HSC supplementary Exam)

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची परीक्षा दि. १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. 

दहावीचा निकाल कमी लागलेल्या शाळांचे अनुदान बंद? झेडपी शाळांची गुणवत्ता वाढली

इयत्ता बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा दि. १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १८ जुलै ते १ ऑगस्ट यादरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा एक ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

इयत्ता दहावीचे वेळापत्रक (कंसात परीक्षेची वेळ) :

दि. १८ जुलै – मराठी (स. ११ ते २)

दि. २१ जुलै – हिंदी (स. ११ ते २)

दि. २२ जुलै – इंग्रजी (स. ११ ते २)

दि. २४ जुलै – गणित ( स. ११ ते १)

दि. २५ जुलै – भूमिती (स. ११ ते १)

दि. २६ जुलै – विज्ञान व तंत्रज्ञान भाग १ (स. ११ ते १)

दि. २७ जुलै – विज्ञान व तंत्रज्ञान भाग २ (स. ११ ते १)

दि. २८ जुलै – सामाजिक शास्त्रे पेपर १ – इतिहास व राज्यशास्त्र (स. ११ ते १)

दि. ३१ जुलै – सामाजिक शास्त्रे पेपर २ - भूगोल (स. ११ ते १)

इयत्ता बारावीचे वेळापत्रक (कंसात परीक्षेची वेळ) :

दि. १८ जुलै – इंग्रजी (स. ११ ते २)

दि. १९ जुलै – हिंदी (स. ११ ते २)

दि. २० जुलै – मराठी (स. ११ ते २)

दि. २१ जुलै – सहकार व भौतिकशास्त्र (स. ११ ते २)

दि. २२ जुलै – चिटणीसाठी कार्यपध्दती (स. ११ ते २), मानसशास्त्र (दु. ३ ते ६)

दि. २४ जुलै – राज्यशास्त्र व रसायनशास्त्र (स. ११ ते २)

दि. २५ जुलै – इतिहास (स. ११ ते २)

दि. २६ जुलै – गणित व संख्याशास्त्र (स. ११ ते २), तत्वज्ञान (दु. ३ ते ६)

दि. २७ जुलै – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नविज्ञान व तंत्रज्ञान (स. ११ ते २)

दि. ३१ जुलै – जीवशास्त्र (स. ११ ते २)

दि. १ ऑगस्ट – पुस्तपालन आणि लेखाकर्म (स. ११ ते २)

दि. २ ऑगस्ट – भूगोल (स. ११ ते २)

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo