NEET 2023 : ‘त्या’ ३८ महाविद्यालयांमध्ये ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळणार का? विद्यार्थी, पालक संभ्रमात

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही दिवसांपूर्वीच ३८ महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. तर १०२ महाविद्यालयांना नोटीसा बजावल्या आहेत.

NEET 2023 : ‘त्या’ ३८ महाविद्यालयांमध्ये ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळणार का? विद्यार्थी, पालक संभ्रमात
NEET Counseling 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

MBBS Admission 2023 : देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET 2023) परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी व पालकांना प्रतिक्षा आहे. निकालानंतर NEET काउंसिलिंग होणार आहे. पण यावरूनच देशभरात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) काही दिवसांपूर्वीच ३८ महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. तर १०२ महाविद्यालयांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे ३८ महाविद्यालयांतील सुमारे ३ हजार ८०० जागांचा काउंसिलिंगमध्ये समावेश होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. (NEET Counseling 2023)

जुलै-ऑगस्ट महिन्यात देशभरातून NEET  काउंसिलिंग होणार आहे. या पार्श्ववभूमीवर विद्यार्थ्यांची नावनोंदणी, शुल्क भरणे अशी तयारी सुरु असताना वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्याचा परिणाम त्यावर होणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पुणे विद्यापीठासह मुंबई, कोकण विद्यापीठालाही मिळाले नवे कुलगुरू; कोण आहेत नवे कुलगुरू?

बायोमेट्रिक उपस्थितीत अनियमितता तसेच इतर कारणांमुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ३८ वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. तर १०२ महाविद्यालयांना करणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तामिळनाडू, आसाम, आंध्रप्रदेश, गुजरात, पुदुचेरी, पंजाब या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये सुमारे ३ हजार ८०० जागा उपलब्ध होत्या.

आता विद्यार्थी NEET परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. NEET  कौन्सलिंगच्या आधारावरच प्रवेशाचे चित्र स्पष्ट होणार आहे. NEET  कौन्सलिंग मध्ये मान्यता रद्द झालेली महाविद्यालये सहभागी होऊ शकतील की नाही, हे अद्याप आयोगाने स्पष्ट केलेले नाही. याबाबत आयोगाच्या भूमिकेकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

SPPU : आपलीच माणसे सर्व ठिकाणी बसवण्याचा अट्टाहास! राज्यपाल करणार का हस्तक्षेप?

दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार देशात २०१४ नंतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ पुर्वी देशभरात एमबीबीएसच्या ५१ हजार ३४८ जागा होत्या. त्यामध्ये तब्बल ९४ टक्क्यांनी वाढ होऊन सध्या ९९ हजार ७६३ जागा उपलब्ध आहे. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढ झाली असून या जागा ३१ हजार १८५ वरून ६४ हजार ५५९ वर पोहचल्या आहेत.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo