UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम; ‘पीएचडी’वर फुली

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आता किमान पात्रता ही NET/SET/SLET ही करण्यात आले आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात ट्विट करूंन याविषयीची माहिती दिली आहे.

UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम; ‘पीएचडी’वर फुली
NET/SET/SLET for Assitant Professor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या (Assistant Professor) नियुक्तीच्या नियमांत महत्वपूर्ण बदल केले आहेत. सहाय्यक प्राध्यापकाच्या पदासाठी आता पीएच.डी. (PhD) चे बंधन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट (SET), नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी मिळणार आहे.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आता किमान पात्रता ही NET/SET/SLET ही करण्यात आले आहे. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी यासंदर्भात ट्विट करूंन याविषयीची माहिती दिली आहे. दरम्यान, युजीसीकडून सहायक प्राध्यापक पदासाठी केवळ किमान पात्रता सेट, नेट केली असून इतर कोणत्याही नियमांत बदल केलेला नाही.

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

यूजीसीने  यासंदर्भात ३० जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या नियमातील नवीन बदल १ जुलै पासून लागू करण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठांसह महाविद्यालयांमध्येही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पीएचडी पदवी बंधनकारक होती. नवीन बदलानुसार ही अट काढून टाकण्यात आली आहे.

युजीसीने २०१८ मध्ये पीएचडीची अट विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदासाठी बंधनकारक केली होती. त्यामुळे सेट, नेट उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विभागांमध्ये सेट, नेटसह पीएचडीही आवश्यक होती. सेट, नेट उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे युजीसीने केलेल्या नवीन सुधारणेमुळे या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD