पुस्तकातील वहीच्या पानांवर करता येतील २१ नोंदी! ‘बालभारती’ने सांगितले १५ फायदे

बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी शिक्षकांसाठी याबाबतचे परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत.

पुस्तकातील वहीच्या पानांवर करता येतील २१ नोंदी! ‘बालभारती’ने सांगितले १५ फायदे
Balbharati New Books

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे बालभारतीने (Balbharati) यंदापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांच्या (Balbharati New Books) रचनेत बदल केला आहे. पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली असून विद्यार्थ्यांना (Students) त्यावर महत्वाच्या नोंदी करता येणार आहे. ‘बालभारती’ने अशा २१ नोंदींची यादीच शिक्षकांना (Teachers) पाठविली आहे. त्याचप्रमाणे या नोंदींचा व वहीच्या पानाचे १५ फायदेही सांगितले आहेत.

बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील (Krishnakumar Patil) यांनी शिक्षकांसाठी याबाबतचे परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा

बालभारतीच्या सूचना, अशा करता येतील नोंदी...

१. प्रत्येक विदयार्थ्याच्या 'माझी नोंद' यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.

२. विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.

३. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी

४. महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी

५. वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी

६. काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती/ साहित्यांची नोंद घेणे.

७. पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी.

८. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.

९. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे.

१०. चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी

११. पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी

१२. कच्चे काम (पेन्सिलने ), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी.

१३. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद

शाळेत स्कर्ट, फ्रॉकवर येणार बंदी; मुलींसाठी नवीन ड्रेसकोडची शिफारस

१४. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे.

१५. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे.

१६. रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी)

१७. विषयाच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना सूचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसाठी

१८. विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद

१९. गृहकार्य लिहून घेण्यासाठी

२०. विमर्शी (Reflective) किंवा चिंतनशील मुट्ट्यांची नोंद

२१. अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी

पुस्तकात वहीच्या पानाचे हे आहेत फायदे

१. एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.

२. पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.

३. नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण (Feedback) व दृढीकरण (Fixation) होईल.

४. विदयार्थ्यांना स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.

५. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विदयार्थ्यांना 'माझी नोंद' यामध्ये नोंदवता येतील.

६. त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.

७. स्वतःचे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील

८. आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.

९. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.

१०. पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल.

११. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.

१२. अध्यायनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.

१३. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.

१४. घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल.

१५. पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे समजेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo