कोण म्हणाले प्राथमिक शिक्षक संघटना संपाबाहेर; शाळा बंद ठेवून आंदोलन करणार

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासित केले होते. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मन वळवले होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संघटना संपातून बाहेर पड ल्याचे बोलले जात होते. परंतु, प्राथमिक शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी असून अखेरपर्यंत संपात सहभागी असणार आहे.

कोण म्हणाले प्राथमिक शिक्षक संघटना संपाबाहेर; शाळा बंद ठेवून आंदोलन करणार

 जुन्या पेन्शन योजनेची लढाई आता राज्यातील शिक्षकांच्या आत्मसन्मानाची झालेली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना मिळेपर्यंत ही लढाई न थांबवता  सुरू ठेवण्याचा निर्धार पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केला आहे.त्यामुळे सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शाखेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी स्पष्ट केले.

      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासित केले होते. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मन वळवले होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संघटना संपातून बाहेर पड ल्याचे बोलले जात होते. परंतु, प्राथमिक शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी असून अखेरपर्यंत संपात सहभागी असणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणीने संपात सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने राज्यातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात.या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये महाराष्ट्रातील सर्व सरकारी निमसरकारी व शासकीय व शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच पुणे जिल्हा प्रार्थमिक शिक्षक संघ सहभागी आहे. सर्व तालुका संघ अध्यक्ष व कार्यकारणी यांनी गोंधळून न जाता जुन्या पेन्शन योजनेचा लढा अधिक तीव्र करावा.तसेच शाळा बंद ठेवून संप यशस्वी करावा.