शाकाहारींसाठी राखीव जागेवर मांसाहार केल्याने विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दंड

काही महिन्यांपूर्वी IIT मुंबईच्या कँटीन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

शाकाहारींसाठी राखीव जागेवर मांसाहार केल्याने विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दंड
IIT Bombay

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांपासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मुंबईमध्ये शाकाहारी-मांसाहारीचा वाद सुरु आहे. हा वाद सध्या चिघळण्याची चिन्ह आहेत. शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या टेबलरवर संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी मांसाहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे.  

 

काही महिन्यांपूर्वी IIT मुंबईच्या कँटीन मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर संस्थेने तोडगा काढत काही दिवसांपूर्वी वसतिगृह १२, १३ आणि १४ च्या वसतिगृहांच्या कॉमन कॅन्टीनमधील सहा टेबल्स "फक्त शाकाहारी जेवणासाठी" राखीव ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागात पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी भरती

 

या निर्णयाला विरोध म्हणून काही विद्यार्थ्यांनी मुद्दामून शाकाहारी जागेवर मांसाहार केला. अशा प्रकारचा विरोध प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १२ नंबरच्या हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याला १० हजार रुपयाचा  दंड ठोठावण्यात आला आहे. इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.  ओळख पटल्यानंतर दोघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती  भोजनालय समितीने दिली.

 

अन्य दोन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी समितीने तीन वसतिगृहाच्या विद्यार्थी प्रतिनिधींकडे मदत मागितली आहे. समितीकडून विद्यार्थ्यांना भोजनालयात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी टेबल राखीव ठेवल्यामुळे कॅम्पसमध्ये भेदभाव वाढत असल्याचा मुद्दा विद्यार्थ्यांचा एक गट उपस्थित करत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j