एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ४ ऑक्टोबर पासून;  १७ जुलै पासून नोंदणी सुरु 

शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाला २०१५ पासून शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे,

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ४ ऑक्टोबर पासून;  १७ जुलै पासून नोंदणी सुरु 
Elementary and Intermediate Drawing Exam 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कला संचालनालयच्यावतीने शासकीय रेखाकला (Elementary and Intermediate Drawing Exam 2023) परीक्षा ऑफलाईन पध्दतीने ४ ऑक्टोबर  ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षेसाठीची नोंदणी १७ जुलै पासून सुरु होणार आहे. शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाला २०१५ पासून शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ही परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती कला संचालनालयच्यावतीने देण्यात आली आहे.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेसाठी इच्छुक उमेदवार  www.doa.maharashtra.gov.in/https//dge.doamh.in या वेबसाईट वरून परीक्षा शुल्क भरून नोंदणी करू शकतात. १७ ते २१ ऑगस्ट  दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नावनोंदणी करता येणार आहे. तर १ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी प्रत्यक्ष शुल्क भरणार आहेत त्यांच्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात आला आहे तर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० रुपये परीक्षा  शुल्क आकारण्यात आले आहे.

NEP मध्ये खासगी क्लासला विरोध असताना पुणे महापालिकेकडून प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य

 इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी प्रत्यक्ष शुल्क भरणार आहेत त्यांच्यासाठी १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे, तर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७० रुपये परीक्षा  शुल्क आकारण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे १०० रुपये व ७० रुपये परीक्षा शुल्क असेल. 

वस्तुचित्र (ऑब्जेक्ट ड्रॉईंग ) आणि स्मरण चित्र (मेमरी ड्रॉईंग ) या विषयाची परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे तर संकल्प चित्र - नक्षीकाम (डिजाईन) आणि कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग) या विषयाची परीक्षा ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेडस्थिरचित्र (स्टीललाईफ  ड्रॉईंग) आणि स्मरण चित्र (मेमरी ड्रॉईंग) या विषयाची परीक्षा ६ ऑक्टोबर रोजी होईल. संकल्प चित्र - नक्षीकाम (डिजाईन) आणि कर्तव्यभूमिती, घनभूमीती  व अक्षरलेखन (प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री  अँड लेटरिंग) या विषयाची परीक्षा ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD