Post SSC Diploma : ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या नऊ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज

दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

Post SSC Diploma : ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या नऊ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज
Post SSC Diploma Engineering

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीनंतरच्या पदविका (Post SSC Diploma) अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी (Engineering Admission) विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सीईटी सेलकडून (CET Cell) सुमारे सव्वा लाख पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी हे दहावीत शंभर टक्के गुण मिळालेले आहेत. तर नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या ९ हजार ४०० विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी अर्ज केला आहे. (Engineering Admission 2023) 

दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या यादीबाबत काही हरकती किंवा सुचना असल्यास १९ तारखेपर्यंत नोंदविण्याचे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे.

'balbharati.in’ विकणे आहे! शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, ‘डोमेन’ विक्रीची जाहिरात

गुणवत्ता यादीनुसार इयत्ता दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळविलेल्या १५ विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. विशेषमध्ये त्यामध्ये १० मुलांचा समावेश आहे. गणित विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळविलेले सात, विज्ञानात शंभर टक्के गुण मिळविलेले ३ आणि इंग्रजी विषयात शंभऱ टक्के गुण मिळविलेले दोन विद्यार्थी आहेत.

एकूण १ लाख २४ हजार १८४ पात्र विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ३७६ विद्यार्थी हे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले आहेत. तर ८० ते ९० टक्क्यांच्यादरम्यान ३६ हजार ४१७ विद्यार्थी आहेत. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठीचे कटऑफ अधिक लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यादीवर हरकती नोंदविल्यानंतर त्यानुसार यादीत बदल करून अंतिम यादी २१ जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. तर पहिल्या फेरीसाठी २२ जुलै रोजी प्रवर्गनिहाय प्रवेश क्षमता व उपलब्ध जागांची स्थिती प्रसिध्द केली जाईल. त्याआधारे विद्यार्थ्यांना २३ ते २६ जुलै दरम्यान ऑनलाईन पसंती क्रम भरून अर्ज सादर करता येतील. तरे २८ जुलै रोजी पहिली निवड यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थेमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD