विद्यापीठांचे वरातीमागून घोडे : विद्यार्थ्यांना मराठीतून पुस्तके देण्यास विलंब

विज्ञान व वाणिज्य विषयाची १० पुस्तके दोन आठवड्यात तर उर्वरित पुस्तकांचे भाषांतर सप्टेंबर महिना अखेरपर्यंत विद्यापीठांना करावे लागणार आहे.

विद्यापीठांचे वरातीमागून घोडे :  विद्यार्थ्यांना मराठीतून पुस्तके देण्यास विलंब

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सर्व विद्यापीठांनी (All the universities in the state) पुढील दोन आठवड्यात विज्ञान व वाणिज्य  विषयाच्या (Science and Commerce subjects) अभ्यासक्रमाची दहा इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर (Translation of English books into Marathi)करावे. तसेच सप्टेंबर महिना अखेरपर्यंत (Translation of books by the end of September) उर्वरित सर्व विषयांच्या पुस्तकांच्या भाषांतराचे काम पूर्ण करावे. त्याचप्रमाणे या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar) यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना दिल्या आहे.

हेही वाचा : ‘कॅरीऑन’साठी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आक्रमक; विद्यापीठात जोरदार आंदोलन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला प्राधान्य देण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व क्रमिक पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध होणे गरजेचे आहे.राज्यपाल कार्यालयातर्फे सुद्धा सर्व विद्यापीठांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरीही अद्याप विद्यापीठांनी पुस्तके तयार केली नाहीत.त्यामुळेच राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने सर्व विद्यापीठांची ऑनलाइन बैठक घेतली.त्यात भाषांतरित पुस्तकांबाबत केलेल्या दिरंगाई बद्दल संबंधितांना चांगलेच खडसावण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी सर्व क्रमिक पुस्तकांचे भाषांतर होणे अपेक्षित होते. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील पुस्तके मिळू शकली नाहीत. त्यामुळे  भाषांतरित पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत एक वेळापत्रकच निश्चित करण्यात आले.तसेच उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी यासंदर्भातील एक परिपत्रक प्रसिद्ध केले.त्यानुसार विज्ञान व वाणिज्य विषयाची १० पुस्तके दोन आठवड्यात तर उर्वरित पुस्तकांचे भाषांतर सप्टेंबर महिना अखेरपर्यंत विद्यापीठांना करावे लागणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञानशाखेच्या पुस्तकांच्या भाषांतरासंदर्भात काही प्राध्यापकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या समितीने कोणती कामे केली, याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच वाणिज्य शाखेच्या पुस्तकांच्या भाषांतराबाबत लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.