‘कॅरीऑन’साठी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आक्रमक; विद्यापीठात जोरदार आंदोलन

गेल्या एक महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाच्या (NSUI) नेतृत्वाखाली विद्यापीठात आंदोलन करत आहेत.

‘कॅरीऑन’साठी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आक्रमक; विद्यापीठात जोरदार आंदोलन
Students protest in SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आम्हाला पास करा, असे आम्ही म्हणत नाही, आम्हाला फक्त एक संधी द्या, असे म्हणत अभियांत्रिकी पदवीच्या (Engineering Degree) विद्यार्थ्यांनी गुरूवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune Univesity) कॅरीऑनची (Carry On) मागणी करत आंदोलन केले. कोरोनाचे (Covid 19) संकट आणि त्यानंतर गुण पद्धतीत बदल झाल्यामुळे विद्यापीठाने आम्हाला फक्त एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

गेल्या एक महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाच्या (NSUI) नेतृत्वाखाली विद्यापीठात आंदोलन करत आहेत. दि. १८ ऑगस्टला आम्ही कॅरीऑनच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, तेव्हा आम्ही यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आम्हाला विद्यापीठाकडून सांगण्यात आले.  त्यानंतर आमच्या तीन बैठका झाल्या, त्या बैठकीत ३१ तारखेला आम्हाला विद्यापीठात बोलवण्यात आले. परंतु अद्याप कुलगुरू आमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले नाहीत, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी दिली.

सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठीतून पुस्तके; उच्च शिक्षण विभागाच्या विद्यापीठांना सूचना

अद्याप निर्णय न झाल्याने आणि आता दि. ४ सप्टेंबरपासून पुढील परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोर जावे लागत असल्याचेही जैन यांनी यावेळी सांगितले. निकाल वेळेत न लावणे, पुनर्मुल्यांकन, पेपर रिचेकिंग यासंदर्भात आलेल्या विविध अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबाबत नाराजी पसरली आहे. वारंवार आंदोलन करूनही कॅरीऑनच्या मागणीवर निर्णय न झाल्याने विद्यार्थी संतापाच्या भावना व्यक्त करत आहेत.

विद्यापीठाला विद्यार्थ्यांची गरज नाही का?, असा सवालही आता विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher and Technical Education) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षात अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑनची संधी मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo