परीक्षा परिषदेची ढकलगाडी; शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज कधी भरायचे? आजचा मुहूर्तही हुकला

शिष्यवृत्ती परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होता चालली आहे. त्यामुळे जुलै महिन्यांपासूनच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरूवात करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता.

परीक्षा परिषदेची ढकलगाडी; शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज कधी भरायचे? आजचा मुहूर्तही हुकला
Scholarship Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MSCE) घेतल्या जाणा-या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे (Scholarship Examination) अर्ज भरण्यास आज (दि.१ ) पासून सुरूवात केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप परिषदेने ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. शुक्रवारी दुपारनंतर किंवा सोमवारपासून सर्वांना सुरळीतपणे अर्ज भरता येतील, असे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

 

शिष्यवृत्ती परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होता चालली आहे. त्यामुळे जुलै महिन्यांपासूनच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरूवात करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता. परंतु, परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष या दोन्ही पदांवर नवीन अधिकारी बदलून आले. त्यामुळे पूर्वी झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र, १ सप्टेंबरपासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरूवात केली जाईल, असे परिपत्रक परीक्षा परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणांमुळे त्यास पुन्हा विलंब होत आहे.

पुण्यातील शिक्षकांचे 'शालार्थ आयडी'साठी शिक्षक दिनी उपोषण

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी, शिष्यवृत्ती परीक्षेच्या घसरलेल्या निकालात सुधारणा व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच  या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज लवकर भरून घेतले जात आहेत. सर्व गट शिक्षण व विस्तार अधिकारी यांना शिष्यवृत्तीच्या दृष्टीने आवश्यक तयारी करून घेण्याबाबत शिक्षण विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया शुकवारी दुपारी सुरू होईल, या दृषीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, काही तांत्रिक अडचणी आल्या तर सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांना सुरळीतपणे ऑनलाईन अर्ज भरता येतील, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo