विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी : डॉ. आदित्य अभ्यंकर यांचे मार्गदर्शन

युनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank Of India) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या यू-जिनिअस  (U-Genius) स्पर्धेच्य़ा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी : डॉ. आदित्य अभ्यंकर यांचे मार्गदर्शन

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

प्रत्येक विद्यार्थी (Students) हा युनिक असतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ची एक स्वतंत्र ओळख बनवली पाहिजे. लहान वयातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा (Science and Technology) अभ्यास करण्याची संधी मिळाल्यास त्यातून मिळणारा अनुभव आणि व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते, असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phul Pune University) विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर (Aditya Abhyankar) यांनी विद्यार्थ्यांना केले.

युनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank Of India) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या यू-जिनिअस  (U-Genius) स्पर्धेच्य़ा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिंकणे महत्वाचे नसते, सहभाग महत्वाचा असतो, असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले.

‘कॅरीऑन’साठी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आक्रमक; विद्यापीठात जोरदार आंदोलन

अभ्यंकर यांच्यासह या कार्यक्रमाला बॅंकेचे डिप्युटी झोनल हेड मयांक भारद्वाज, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक सुमित रामटेके आदी उपस्थित होते. युनियन बॅंकेकडून गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी यू जिनिअस उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे (Quiz Compitition) आयोजन केले जाते. 

युवा पिढीला शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि मुलांचा बौद्धिक विकास व्हावा, या हेतूने राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन केले जाते, असे युनियन बॅंकेकडून सांगण्यात आले. यावर्षी तीसहून अधिक शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बॅंकेचे डिप्युटी झोनल हेड मयांक भारद्वाज यांनी दिली.

पुण्यामध्ये पार पडलेली ही स्पर्धा शहर पातळीवरील होती. स्पर्धेत पुण्यातील देहू रोडवरील  केंद्रीय विद्यालय विजेते ठरले आहे. शहरस्तरावरच्या विजेत्या संघाची मुंबईमध्ये अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत विजेता ठरलेल्या संघाला सन्मानचिन्हासह एक लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. आता पुढील शहर पातळीवरील स्पर्धा नागपूर येथे होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo