SSC-HSC Result : गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करण्याची संधी; बोर्डाने दिली महत्वाची माहिती  

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत दि. २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली असून त्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

SSC-HSC Result : गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करण्याची संधी; बोर्डाने दिली महत्वाची माहिती  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC-HSC Board) सोमवारी दुपारी एक वाजता इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल (Supplementary Exam Result) ऑनलाईन जाहीर केला आहे. ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध असले. त्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत दि. २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली असून त्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) या द्वारे भरता येईल.

SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर, मंडळाकडून अधिकृत घोषणा

जुलै-ऑगस्ट २०२३ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरून किंवा हस्तपोहोच किंवा रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे दि. २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रति विषय ३०० रुपये प्रमाणे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.

ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ

इयत्ता दहावी - http://verification.mh-ssc.ac.in

इयत्ता बारावी - http://verification.mh-hsc.ac.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo