CBSE result: प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; अथर्व भाजीपाले दहावीत प्रथम

प्रियदर्शनी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. शाळेतील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी एक सारखे गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

CBSE result: प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; अथर्व भाजीपाले दहावीत प्रथम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणारी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसरी- इंद्रायणी नगर येथील प्रियदर्शनी स्कूलचा (Priyadarshani School )इयत्ता दहावीचा सीबीएसईचा निकाल (10th Cbse Result) शंभर टक्के लागला. शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत उज्ज्वल यश संपादित केले. अथर्व भाजीपाले (Atharva bhajipale) या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळवत (Atharva bhajipale) शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.                   

    प्रियदर्शनी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. शाळेतील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी एक सारखे गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. आर्यन प-हाड, आयुष वसगडे आणि कृतिका शिर्के या तीनही विद्यार्थ्यांनी ९७.२० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर दिव्या जाधव, ऋचा दसनाम आणि आदित्य वामन या तीनही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.           

          प्रियदर्शनी शाळेच्या ९ विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत .तसेच  संस्कृत विषयात ८ विद्यार्थ्यांनी आणि  गणित विषयात ३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून चमकदार कामगिरी दाखवली आहे. शाळेच्या २९ विद्यार्थ्यांना  ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असून ५१ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले आहे. तर ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून ११  विद्यार्थी प्रथम श्रेणीच्या खाली आहेत. 

      प्रियदर्शनी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.गायत्री जाधव व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दहावीच्या १२१ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. शाळेच्या संस्थापक सचिव तरुणा सिंग,व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंग,व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र सिंग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तर  प्रियदर्शनी शाळा (एसएससी बोर्ड) प्राचार्या अर्पिता दीक्षित यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.  

------------

"शाळेच्या शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.विद्यार्थ्यांनी सुध्दा मन लावून अभ्यास केला.तसेच पालकांनी मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.त्यामुळे दहावीच्या निकालात मिळालेले यश हे विद्यार्थी ,शाळा,शिक्षक आणि पालक या सर्वांचे आहे." 

- डॉ. गायत्री जाधव , प्राचार्य, प्रियदर्शनी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (CBSE), भोसरी- इंद्रायणी नगर