विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळाली; पण बॅंकेत जमा नाही झाली 

४  हजार ६४२ पैकी पाचवीच्या १ हजार ३८० आणि इयत्ता आठवीच्या १ हजार २२ अशा  एकूण २ हजार ४०२ विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बॅंक खात्याची सुधारित माहिती संबंधित शाळेने भरली नाही. 

विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळाली; पण बॅंकेत जमा नाही झाली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत (5th 8th scholarship exam) पास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम (Scholarship Amount) दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे शिक्षण विभागाचा (Education Department) कार्यभार चव्हाट्यावर आला आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Examination Council) काढलेल्या परीपत्रकानुसार 2022 व 2023 या दोन्ही वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती अद्याप भरली नाही. त्यामुळे स्कॉलरशीप मिळूनही हजारो विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर (on the student's bank account ) दोन वर्षांची  स्कॉलरशीपची रक्कम जमाच झाली नाही.

हेही वाचा : इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर
 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) परीक्षा घेतली जाते. लाखों विद्यार्थ्यांमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम देता येत नसल्याची समोर आली आहे. त्यातही २०२२  मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बॅंक खात्याची माहीती दुरूस्त करण्यासाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध आहे. तरीही ४  हजार ६४२ पैकी पाचवीच्या १ हजार ३८० आणि इयत्ता आठवीच्या १०२२ अशा  एकूण २ हजार ४०२ विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बॅंक खात्याची सुधारित माहिती संबंधित शाळेने भरली नाही. 

 केवळ २०२२ नाही तर २०२३ मधील पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती शाळांनी अद्याप जमा केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशीप देता येत नाही. सर्व शाळांनी याबाबत आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, शाळेकडून याबबात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी बॅंक खात्याची माहिती भरण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात.तसेच कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. अन्यथा शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील,असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 
--------------------------------------------