इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर
SSC-HSC Exams Timetable

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (State Board) इयत्ता दहावी (SSC Exam) व बारावीच्या (HSC Exam) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक (Exam Timetable) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ पेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत होईल.

 

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.

भारतात शास्त्रज्ञ, डॉक्टरांपेक्षा शिक्षकांवर अधिक भरवसा; अभ्यासातून आले समोर

इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. १० ते २९ फेब्रुवारी दरम्यान तर इयत्ता बारावीची परीक्षा दि. २ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्मयिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

सविस्तर वेळापत्रक येथे पाहता येणार - www.mahasscboard.in

दहावी-बारावी लेखी परीक्षांचे वेळापत्रक

इयत्ता बारावी सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम - दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च

माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा (इ. बारावी) - दि. २० मार्च ते २३ मार्च

इयत्ता दहावी - दि. १ मार्च ते २६ मार्च

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k