JEE मेन २०२४ साठी  नोंदणी सुरु 

जेईई मेन 2024 नोंदणीच्या तारखेसह, जेईई मेनचे निकाल १२ फेब्रुवारी रोजी घोषित केले जाणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

JEE मेन २०२४ साठी  नोंदणी सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE MAIN 2024 ) साठी नोंदणी सुरू केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना  jeemain.nta.nic.in किंवा nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन JEE मेन २०२४ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येईल.

JEE मेन २०२४ सत्र 1 साठी अर्ज करण्यास ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. एनटीएकडून शहराची माहिती स्लिप दिली जाणार असून त्यामुळे  उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राची आणि शहराची माहिती मिळू शकेल. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. 
जेईई मेन 2024 नोंदणीच्या तारखेसह, जेईई मेनचे निकाल १२ फेब्रुवारी रोजी घोषित केले जाणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेतली जाईल.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना NITs, IIITs, इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs), विद्यापीठांमध्ये सहभागी राज्य सरकारांकडून अनुदानित किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जाईल. ही JEE (प्रगत ) साठी पात्रता परीक्षा देखील आहे, जी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.
उमेदवारांना जेईई मेन २०२३ सत्र १ किंवा सत्र २ किंवा दोन्हीमध्ये उपस्थित राहण्याचा पर्याय आहे. जर उमेदवारांनी दोन्ही सत्रांच्या परीक्षा दिल्या तर अंतिम निकालामध्ये सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल. त्यांना सत्र २ मध्ये पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, असे उमेदवार सत्र 2 विंडो दरम्यान थेट लॉग इन करून पैसे भरू शकतात आणि आवश्यक असल्यास परीक्षा केंद्र बदलू शकतात. त्याचाप्रमाणे सत्रासाठी उपस्थित असलेल्यांनी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

जेईई मेन पेपर 1 मध्ये दोन विभाग असतील. विभाग A मध्ये प्रत्येक विषयासाठी 20 (MCQ) असतील, तर विभाग B मध्ये प्रत्येक विषयासाठी 10 (संख्यात्मक प्रश्न) असतील. त्यापैकी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.  JEE मुख्य पेपर २ तीन भागांमध्ये विभागला जाईल. भाग १ मध्ये २० MCQ आणि गणिताशी संबंधित १० संख्यात्मक प्रश्न असतील, त्यापैकी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. भाग २ मध्ये अभियोग्यता चाचणी असेल, तर भाग ३ मध्ये योजना-आधारित वस्तुनिष्ठ प्रकार MCQs असतील.