शालार्थ आयडीसाठी जाचक अट केली रद्द; उप सचिवांनी काढले आदेश
शाळांमधील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी जाहिरात द्यायची असल्यास संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
खासगी अनुदानित (Aided Schools) आणि अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त असलेले मात्र अद्यापही शालार्ड आयडीसाठी (Shalarth ID) झगडणाऱ्या शिक्षक (Teachers) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालार्ड आयडीसाठीची जाहिरातीची अट शिक्षण विभागाने (Education Department) शिथील केली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती. विविध संघटनांसह आमदारही त्यासाठी आग्रही होते.
शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव समीर सावंत यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शाळांमधील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी जाहिरात द्यायची असल्यास संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. तसेच जास्त खपाच्या दोन वर्तमानपत्रात जाहिरात देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्ड आयडी मिळण्यात अडचणी येत होत्या.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी नवीन मतदार यादी तयार होणार
शिक्षण विभागाने ही जाचक अट रद्द करावी, यासाठी अनेक संघटनांकडून मागणी केली जात होती. अखेर शिक्षण विभागाने ही अट मागे घेतली आहे. उप सचिवांनी काढलेल्या आदेशा म्हटले आहे की, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट शिथील करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे दि. ६ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील पात्र शाळा, तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत संबंधित पदाची जाहिरात देण्यासाठी परवानगी घेतली नसेल, तरी ही जाहिरात किमान जिल्हास्तरीय वर्तमानपत्रामध्ये दिलेली असल्यास ती जाहिरात ग्राह्य धरण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j
eduvarta@gmail.com