पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका 

संशोधक विद्यार्थ्यांच्या अडी-आडचणी संशोधन केंद्र स्तरावरच सोडवाव्यात.यापुढे विद्यार्थ्यांच्या पीएच.डी. प्रक्रिये संदर्भातील कामासाठी संशोधन केंद्राचे केंद्र प्रमुख / समन्वयक / प्राधिकृत कर्मचारी यांनाच शैक्षणिक प्रवेश विभागात पाठवावे,अशा स्पष्ट सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या आहेत. 

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न विविध संशोधन केंद्रांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रशासकीय कामांसाठी विद्यापीठातील सांविधानिक अधिकारी आणि शैक्षणिक प्रवेश विभागाला (Department of Academic Admissions) भेटण्यासाठी पाठवतात. मात्र.सर्व केंद्रांनी संशोधक विद्यार्थ्यांच्या (Research student) अडी-आडचणी संशोधन केंद्र स्तरावरच सोडवाव्यात.यापुढे विद्यार्थ्यांच्या पीएच.डी. प्रक्रिये संदर्भातील कामासाठी संशोधन केंद्राचे केंद्र प्रमुख / समन्वयक / प्राधिकृत कर्मचारी (Center Head / Coordinator / Authorized Staff) यांनाच शैक्षणिक प्रवेश विभागात पाठवावे,अशा स्पष्ट सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा : Breaking News : त्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले

विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या संस्थेच्या प्रचलित नियमांच्या आधारे संशोधन केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रामधील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोई- सुविधा आणि इतर आवश्यक प्रक्रियेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित संशोधन केंद्राची व पर्यायाने त्या संशोधन केंद्र प्रमुखाची अथवा त्या प्रमुखांनी नेमलेल्या समन्वयकांची आहे.
 
संशोधन केंद्रांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक सोई- सुविधा पुरवल्या जात नसल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी किंवा विद्यापीठातील त्यांच्या इतर कामासाठी परस्पर विद्यापीठात पाठवतात. वास्तविक विद्यार्थ्यांच्या अडचणी केंद्र प्रमुखांनी आणि त्यांच्या प्रतिनिधी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडे पाठवून त्यांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. मात्र, असे न होता बहुतेकवेळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विद्यापीठाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सांविधानिक अधिकारी यांचाही वेळा वाया जातो. तसेच शैक्षणिक प्रवेश विभागाच्या कामकाजामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात.
------------------------------------------
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्र यांच्यात अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र प्रमुख किंवा समन्वयक यांनी विद्यार्थ्यांशी कसा संवाद ठेवावा, त्यांना कोणत्या सोई- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यापीठाशी कसा समन्वय ठेवावा, या आणि अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच केंद्र प्रमुख / समन्वयक / प्राधिकृत कर्मचारी यांची कार्यशाळा घेतली जाणार आहे.
- डॉ. पराग काळकर, प्र- कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ