ITI News : राज्यातील ‘आयटीआय’मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरूम, स्वातंत्र्यदिनी होणार सुरूवात

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे ४१९  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, ५४७ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे.

ITI News : राज्यातील ‘आयटीआय’मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरूम, स्वातंत्र्यदिनी होणार सुरूवात
ITI in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालय (DVET) यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरूम (Virtual Classroom)  सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन केले जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त बोलताना लोढा म्हणाले, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्किल इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी परीक्षाच केली कायमची रद्द

राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे ४१९  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, ५४७ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य  विकास  करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात येईल.

कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo