11th Admission : अकरावी प्रवेशाची निवड यादी आज; ‘त्या’ विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागणार

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार आज ऑनलाईन निवड यादी जाहीर केली जाईल.

11th Admission : अकरावी प्रवेशाची निवड यादी आज; ‘त्या’ विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागणार
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

11th Admission Process : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (Centralised Admission Process) आज (दि. २१ जून) निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारे महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. (The selection list for 11th admission will be announced today)

पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरांमध्ये महाविद्यालयांत प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार आज ऑनलाईन निवड यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये त्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती मिळेल. त्या माहितीची प्रिंटआऊट घेऊन विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येईल.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक; उरले फक्त २७ दिवस

अशी होईल प्रक्रिया

दि. २१ जून (स. १०) – नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे. कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर करणे.

दि. २१ ते २४ जून (सायं. ६ पर्यंत) – पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे. कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे. कोटांतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे.

...तर प्रवेश घ्यावाच लागणार

विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिनमध्ये (Proceed for Admission) वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावा आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

दहावीचा निकाल कमी लागलेल्या शाळांचे अनुदान बंद? झेडपी शाळांची गुणवत्ता वाढली

एखाद्या विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे. त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.

एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा/तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल. असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo