केंद्रीय विद्यापीठे, कृषी संस्था, सीए अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू

केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा  (CUET ) पीजी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा २३ ते ३० जून च्या दरम्यान घेतली जाणार आहे.

केंद्रीय विद्यापीठे, कृषी संस्था, सीए अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू
Students Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

CUET PG 2023 : नामांकित शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची पात्रता चाचणी घेण्यनासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET) पीजी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा २३ ते ३० जून च्या दरम्यान घेतली जाणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना ५ ते १७ जून दरम्यान झालेली CUET परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. cuet.nta.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते, अशी माहिती NTA कडून देण्यात आली आहे.

महत्वाचा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठांच्या शुल्कात ५० टक्के सवलत

चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन कोर्ससाठी ऑनलाइन नोंदणी सुरु

भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) फाउंडेशन कोर्ससाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी CA परीक्षा पोर्टल icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाईटला भेट  देऊ शकतात. अर्ज भरण्याची शेवटची १ जुलै आहे. CA फाउंडेशन परीक्षा १६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहेत. जून मध्ये होणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षा २४ ते ३० जून दरम्यान संस्थेद्वारे आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत शिफ्टमध्ये घेतल्या जातील. विद्यार्थी परीक्षा पोर्टलवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

11th admission : नॉन क्रिमी लेअर नसले तरी अकरावीत प्रवेश

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA ने भारतीय कृषी संशोधन परिषदेत (ICAR) प्रवेशासाठी पदव्युत्तर आणि पीएचडी प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अखिल भारतीय कृषी प्रवेश परीक्षा (AIEEA) २०२३ चे प्रवेशपत्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकृत वेबसाइट icar.nta.nic.in वर उपलब्ध आहेत.

अखिल भारतीय कृषी प्रवेश परीक्षा पदव्युत्तर आणि अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा (AICE JRF SRF PhD) JRF, SRF, Ph.D साठी ९ जुलै रोजी होणार आहे. AIEEA-पात्र उमेदवार देशातील ७५ कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पात्र असतील, ज्यात ६४ राज्य कृषी, पशुवैद्यकीय, फलोत्पादन आणि मत्स्य विद्यापीठे, चार ICAR-मान्य विद्यापीठे, तीन केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि चार केंद्रीय कृषी विद्यापीठे यांचा समावेश आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo