CA करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आर्टिकलशिपचा कालावधी झाला कमी

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) नुसार शिक्षण आणि प्रशिक्षणाची नवीन योजना तयार करण्यात आली आहे.

CA करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आर्टिकलशिपचा कालावधी झाला कमी
ICAI New regulations

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी (CA) शिक्षण आणि प्रशिक्षणाची नवीन योजना आणली आहे. या अंतर्गत अंतिम परीक्षेपूर्वी आर्टिकलशिपचा (CA Articleship) कालावधी तीन वर्षांवरून दोन वर्षांवर आणण्यात आला आहे. 

ICAI ने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार शिक्षण आणि प्रशिक्षणाची नवीन योजना तयार करण्यात आली आहे. नवीन योजनेत पूर्वीपेक्षा अधिक तंत्रज्ञान मॉड्यूल समाविष्ट करण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे.  

अखेर ‘कृषी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; नऊ पदवी अभ्यासक्रमांमध्ये घेता येणार प्रवेश

नवीन योजनेअंतर्गत, मध्यवर्ती आणि अंतिम स्तरावर प्रत्येक विषयातील ३० गुणांसाठी केस आधारित बहुपर्यायी प्रश्नांद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. याशिवाय  केस स्टडी पेपरमधील  कम्पल्सरी भागा  अंतर्गत विद्यार्थ्याच्या उच्च स्तरीय कौशल्यांचे आणि व्यावसायिक क्षमतेचे मूल्यांकन केले जाणार आहे. ही योजना १ जुलैपासून देशभर लागू होणार आहे.

सीए फाऊंडेशन कोर्स, इंटरमीडिएट आणि फायनल कोर्सचे तीन स्तर आहेत. नवीन योजनेअंतर्गत फाउंडेशन कोर्ससाठी नोंदणी २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. इंटरमिजिएट आणि फायनल अभ्यासक्रमांसाठी १ जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. नवीन योजनेत, पहिली फाउंडेशन परीक्षा जून २०२३ मध्ये आणि इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा मे २०२४ मध्ये सुरू होईल. सध्याच्या योजनेची शेवटची पायाभूत परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे आणि इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षा नोव्हेंबर २०२३ मध्ये होणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2