धक्कादायक : लाईव्ह क्लासदरम्यान विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण, Video व्हायरल

सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. वर्गातील एक विद्यार्थी शिक्षकावर चप्पलने हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

धक्कादायक : लाईव्ह क्लासदरम्यान विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण, Video व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वर्गात मारल्याच्या बातम्या आणि व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियात (Social Media) एका विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षकाला (Teacher) चपलेने मारल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि एन्ट्रन्स परीक्षांसाठी कोचिंग देणाऱ्या एका खासगी संस्थेच्या लाईव्ह क्लास मध्ये हा प्रकार घडला आहे. (Viral Video)

 

सोशल मीडियात अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. वर्गातील एक विद्यार्थी शिक्षकावर चप्पलने हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गुरुवारी रात्रीपासून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित क्लासने  ९ सेकंदाच्या क्लिपवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

महाविद्यालयाचे तुघलकी फर्मान; मुलगा-मुलगी एकत्र बसल्यास, गप्पा मारल्यास थेट प्रवेश रद्द

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, शिक्षक वर्गात मुलांना शिकवत होते, त्यादरम्यान एका विद्यार्थ्याने त्याच्यावर हल्ला केला, तो शिक्षक  खाली वाकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कथित भांडणाचे चित्रीकरण एका विद्यार्थ्याने केले आणि शेअर केले आहे. 

Video : मारहाणीचा व्हिडीओ पाहा...

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठल्या शहरातील आहे, याबाबत स्पष्टता नाही. तसेच विद्यार्थ्याने शिक्षकाला का मारहाण केली, याचेही कारण अद्याप समोर आलेले नाही. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k