सध्याचे द्विलक्षी अभ्यासक्रम बंद होणार; नवीन अभ्यासक्रम ठरले, राज्य सरकारचा निर्णय

सद्यस्थितीत राज्यात राबविले जाणाऱ्या दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमुळे मुलांना रोजगार-स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्याचे द्विलक्षी अभ्यासक्रम बंद होणार; नवीन अभ्यासक्रम ठरले, राज्य सरकारचा निर्णय
Bifocal Courses

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यभरातील शासकीय व खाजगी संस्थांमध्ये शिकविले जाणारे सर्व द्विलक्षी अभ्यासक्रम (Bifocal Courses) कालबाह्य झाले असल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारने (Maharashtra Government) हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ याच शैक्षणिक वर्षासाठी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश होणार असून पुढील वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम (New Bifocal Courses) असतील. त्यामुळे सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये पुढील वर्षी प्रवेश दिले जाणार नाहीत.  

सद्यस्थितीत राज्यात राबविले जाणाऱ्या दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांमुळे मुलांना रोजगार-स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नॅशनल स्कील क्वालीफिकेशन फ्रेम वर्क (NSQF) विकसित केले असून प्रत्येक स्तरावर ज्ञान व कौशल्य आत्मसात करावयाचे स्तर ठरवून दिलेले आहेत. सध्याचे अभ्यास्रम सुसंगत एनएसक्यूएफशी सुसंगत नाहीत.

11th Admission : अकरावी प्रवेशाची निवड यादी आज; ‘त्या’ विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागणार

नविन अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यांत आलेली आहेत. त्यास अनुसरुन राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित व अशासकीय कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये सुरु असलेले दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम बंद करुन राष्ट्रीय व्यवसाय आराखडयाप्रमाणे (NSQF) नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.  

शासन निर्णय़ानुसार, सदयस्थितीत सुरु असणाऱ्या दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांऐवजी नवीन अभ्यासक्रम सत्र २०२४-२५ पासून इयत्ता ११ वी करीता सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित व अशासकीय कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये सुरु करण्यात येतील. सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये सत्र २०२४-२५ पासून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश करण्यात येणार नाहीत. नवीन व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास इच्छुक असणाऱ्या महाविद्यालयांना २०२४-२५ पासुन मान्यता देण्याबाबतचे प्रस्ताव व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शासनास सादर करावे लागतील. नवीन अभ्यासक्रम राबविण्याकरीता सुधारीत मानके संचालनालयामार्फत निश्चित करण्यांत येतील. प्रत्येक तुकडीची प्रवेश क्षमता ५० इतकी राहील.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक; उरले फक्त २७ दिवस

शिक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण

शिक्षकांकरीता आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व नवीन अभ्यासक्रमांकरीता निश्चित केलेली शैक्षणिक अर्हता यामध्ये तफावत दिसून आल्यास सध्याचे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत शिक्षकांनाच आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर राहील. नवीन शिक्षकांची नियुक्ती करताना संबंधित शिक्षकाने नवीन अभ्यासक्रमाकरीता निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणे आवश्यक राहील.

नवीन अभ्यासक्रमाच्या सैध्दांतिक व प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन व आयोजन हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येईल. सदर विषयांच्या सैध्दांतिक परीक्षा राज्य मंडळामार्फत व प्रात्यक्षिक परिक्षा महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात येतील, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo

सध्याचे व नवीन अभ्यासक्रमांची यादी पुढीलप्रमाणे -