सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भारताचा भर 

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाची (एडडब्ल्यूजी) चौथी बैठक आज पुण्यामध्ये सुरु झाली.येत्या 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सादर केल्या जाणार्‍या फलनिष्पत्ती दस्तऐवजाना या बैठकीत अंतीम स्वरूप दिले जाईल.

   सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भारताचा भर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 वैचारिक मतभेद असूनही शाश्वत जागतिक हितासाठी एकत्र काम करणाऱ्या सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भारताचा भर आहे.भारताचे G20 अध्यक्षपद म्हणजे जागतिक शांततेसाठी विविधतेचा लाभ घेण्याची संधी, असे मत G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी व्यक्त केले. 

G 20 अंतर्गत शिक्षण विषयक कार्य गटाची (एडडब्ल्यूजी) चौथी बैठक आज पुण्यामध्ये सुरु झाली.येत्या 22 जून 2023 रोजी शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सादर केल्या जाणार्‍या फलनिष्पत्ती दस्तऐवजाना या बैठकीत अंतीम स्वरूप दिले जाईल.यावेळी हर्षवर्धन श्रृंगला बोलत होते.या प्रसंगी भारताचे शिक्षण विषयक कार्य गटाचे अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी आदी उपस्थित होते. 

चौथ्या शिक्षण विषयक कार्य गटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी G20 प्रतिनिधींबरोबर मंत्री स्तरीय घोषणापत्राच्या मसुद्यावर चर्चा झाली. युनिसेफ (UNICEF), OECD आणि युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संघटनांनी शिक्षण कार्य गटाचा अहवाल सादर केला.एडडब्ल्यूजी अहवाल आणि संकलनाद्वारे संपूर्ण गटासाठी सर्वसमावेशक पद्धतीने एक समान उद्दिष्ट ठरवून, शैक्षणिक धोरणे आणि कार्यक्रम ठरवण्याच्या, भारताचे G20 अध्यक्षपद आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सातत्त्यपूर्ण  प्रयत्नांची G20 सदस्य आणि निमंत्रित देशांनी प्रशंसा केली. 

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत हा जागतिक आणि स्थानिक आव्हानांसाठी उपायांचा स्त्रोत मानला जात आहे, यावर भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी भर दिला. 
के. संजय मूर्ती यांनी चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या  बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.