बँकांमध्ये लिपिक पदाच्या ६ हजार जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.. 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै देण्यात आली आहे. 

बँकांमध्ये लिपिक पदाच्या ६ हजार जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.. 

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनेलने (IBPS) लिपिक पदांसाठी जम्बो भरती (Clerk Post Jumbo Recruitment) जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट्स उमेदवारांना ही सर्वात मोठी संधी आहे. या भरतीद्वारे एकूण 6 हजार 128 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै देण्यात आली आहे. 

यासाठी उमेदवाराला कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे.  1 जुलै 2024 रोजी दरम्यान उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात आली असून, OBC उमेदवारांना 3 वर्ष सूट असणार आहे. 

सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांकडून 850 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे तर SC, ST, PWBD, ESM आणि DESM सारख्या राखीव प्रवर्गांसाठी 175 रुपये शुल्क आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीख निश्चित देण्यात आली नाही.मात्र, पूर्व परीक्षा ऑगस्ट महिन्यता तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.