5th and 8th Scholarship Exam : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला होणार

राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मागणी वर्षी वाढ केली आहे. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी एकूण ५ हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

5th and 8th Scholarship Exam :  पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council ) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक  (5th and 8th Scholarship Exam Schedule) अखेर जाहीर झाले आहे. येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत मागणी वर्षी वाढ केली आहे. त्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी एकूण ५ हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

हेही वाचा : शिक्षण breaking news: अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त लागला; पवित्र प्रणाली संकेतस्थळ सुरू

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज लवकर भरून घेण्यास सुरुवात केली आहे.त्यानुसार १ सप्टेंबर पासूनच विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विलंब शुल्कसह १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात अति विशेष विलंब शुल्कासह विद्यार्थी अर्ज करू शकतील. मात्र ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू ,हिंदी, गुजराती, इंग्रजी , तेलगू आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या वयापेक्षा जर जास्त वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल तर तो देऊ शकतो.त्याला परंतु शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.