विद्यार्थ्यांनो, काही दिवस एकच गणवेश वापरा! सरकारकडून मिळेनात पैसे             

गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शाळा समितीने निश्चित केलेल्या गणवेशासाठीही परिषदेकडूनच पैसे दिले जातात.

विद्यार्थ्यांनो, काही दिवस एकच गणवेश वापरा! सरकारकडून मिळेनात पैसे             
Scout and Guide Uniform

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारकाडून (Maharashtra Government)  सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड (Scout and Guide) या विषयासाठी स्वतंत्र गणवेश (School Uniform) दिला जाणार आहे. मात्र, अद्याप सरकारकडून जिल्हा परिषदा (ZP) व स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील काही दिवस एकाच गणवेशावर आठवडाभर शाळेत (Schools) जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील शाळा गुरूवारपासून सुरू होत आहेत. यापार्श्वभूमीवर गणवेशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना मराठी नकोशी; 'नीट'चे आकडे पाहिल्यावर बसेल धक्का

या गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शाळा समितीने निश्चित केलेल्या गणवेशासाठीही परिषदेकडूनच पैसे दिले जातात. या गणवेशाचे पैसे शाळांना मिळाले आहेत. पण दुसऱ्या गणवेशाला पैसेच मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना एकच गणवेश परिधान करून पुढील काही दिवस शाळेत जावे लागणार आहे.

दरम्यान, समग्र शिक्षा पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत एका गणवेशसाठी प्रती विद्यार्थी ३०० रुपयेप्रमाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी च्या एकूण १ लाख ६० हजार १६७ पात्र विद्यार्थ्यांसाठी ४ काटी २० लाख ५० हजार १०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गणवेशासाठी शासनस्तरावरून रक्कम प्राप्त होताच ऑनलाईन पद्धतीने PFMS द्वारे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कमलाकांत म्हेत्रे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘एससी’ विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती यांना असणार असून यामध्ये रंग, आकार ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहे. सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक ०८/०६/२०२३ नुसार स्काऊट गाईड या द्वितीय गणवेशाचे खरेदी करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत, त्यासाठी शासन स्तरावरून निधी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते की अद्याप जिल्हा परिषदांना दुसऱ्या गणवेशासाठी निधीच मिळालेला नाही.

पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वांना मोफत पाठ्यपुस्तके व पात्र लाभार्थ्यांना गणवेश उपलब्ध होणार आहे. तसेच नवागताचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती मार्फत केले जाणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावरून सर्व अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवी च्या एकूण २ लाख ७२ हजार ३५ व इयत्ता सहावी ते आठवी च्या २ लाख ४७ हजार ९१० असे इयत्ता पहिली ते आठवी च्या एकूण ५ लाख १९ हजार ९४५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी प्रत्येक शाळास्तरावर पाठ्यपुस्तके पोहोंच झालेली आहे. ही पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे, अशी माहितीही कमलाकांत म्हेत्रे यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo