ज्ञान आणि सद्सदविवेकबुद्धीमध्ये फरक करायला शिका - ॲड.उज्ज्वल निकम

भविष्यात विधी क्षेत्रात करीअरच्या अनेक संधी असून कायदा क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे.

ज्ञान आणि सद्सदविवेकबुद्धीमध्ये फरक करायला शिका - ॲड.उज्ज्वल निकम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भविष्यात विधी क्षेत्रात करीअरच्या (career in law) अनेक संधी असून कायदा क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे.तसेच विशेषत:ज्ञान आणि सद्सदविवेकबुद्धी यांमध्ये विद्यार्थ्यांनी फरक करण्याचे शिकावे,असे प्रतिपादन ज्येष्ठ सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम (Senior Government Advocate Adv. Ujjwal Nikam) यांनी केले.

हेही वाचा : 5th and 8th Scholarship Exam : पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला होणार

पुण्यातील अर्हम विधी महाविद्यालयाचे उद्घाटन प्रसंगी निकम बोलत होते.यावेळी पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, अधिवक्ता ऑन रेकॉर्ड सुप्रीम कोर्ट डॉ.राजेंद्र अनभुले ,सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार,महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकांत कोठारी,अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया,सहसंस्थापक व सचिव डॉ.आतीश चोरडिया,कोषाध्यक्ष श्रीकांत पगारिया,अर्हम लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमन मिश्रा, अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश भोसले आदी उपस्थित होते.

कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायपालिकेच्या या पवित्र आणि न्याय्य व्यवसायासाठी सुधीरकुमार बुक्के यांनी प्रोत्साहित केले.डॉ. राजेंद्र अनभुले यांनी वकिलांच्या व्यवसायाचे सामाजिक आणि व्यावहारिक महत्त्व सांगितले.तसेच वकिलांनी समाजात कोणती भूमिका बजावली पाहिजे यावर भर दिला.त्याचाप्रमाणे विद्यार्थ्यांनी विधी क्षत्रातील करिअरकडे कसे पहावे याचेही  मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्तीमालिनी टिके आणि प्रा.रश्मी शिंगवी यांनी केले तर डॉ.शैलेश पगारिया यांनी आभार मानले.