RTE Admission : 'आरटीई' प्रवेशासाठी चार दिवसांत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या एकूण ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी (Students) शुक्रवारपर्यंत केवळ ५८ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत.

RTE Admission : 'आरटीई' प्रवेशासाठी चार दिवसांत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ
RTE 2023 Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्का कायद्याअंतर्गत (RTE 2023) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशासाठी (RTE Admission) निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाचा वेग वाढताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला प्रवेशाची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्याची वेळ आली आहे. चार दिवसांपुर्वीच १५ मेपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा ही तारीख बदलून २२ मे करण्यात आली आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या एकूण ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी (Students) शुक्रवारपर्यंत केवळ ५८ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. मागील चार दिवसांत केवळ चार हजार प्रवेश झाले आहेत. त्यामुळे यापूर्वी दिलेली १५ मेपर्यंतची मुदत पुन्हा वाढविण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून (Education Department) घेण्यात आला आहे.

हेही वाचा : CBSE Exam 2024 : दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, पुरवणी परीक्षा जुलैमध्ये

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) पाच एप्रिल रोजी काढण्यात आली. निवड यादीतील बालकांचे प्रवेश मुदत १३ एप्रिल ते ८ मे पर्यंत होती. त्याला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण अजूनही प्रवेशाचा वेग वाढत नसल्याने शिक्षण विभागाने आता शेवटची संधी देत २२ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशाची सद्यस्थिती –

एकूण राखीव जागा – १ लाख १ हजार ८४६

एकूण अर्ज – ३ लाख ६४ हजार ४१३

प्रवेशासाठी निवड – ९४ हजार ७००

प्रवेश निश्चित (दि. १२ मेपर्यंत) – ५७ हजार ९८४

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2