NEET UG 2024 : वैद्यकीय आयोगाकडून NEET UG साठी सुधारित अभ्यासक्रम जारी

रीक्षेच्या पद्धतीनुसार, NEET प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग असतील. विभाग A मध्ये ३५ प्रश्न असतील आणि विभाग B मध्ये १५ प्रश्न असतील.

NEET UG 2024 : वैद्यकीय आयोगाकडून NEET UG साठी सुधारित अभ्यासक्रम जारी
NEET UG 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) NEET-UG 2024 साठी अभ्यासक्रम जारी करण्यात आला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड (UGMEB) कडून मंजुरी मिळाल्यानंतर, हा सुधारित अभ्यासक्रम NMC च्या www.nmc.org.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आला आहे.  पुढील वर्षी होणाऱ्या NEET UG परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी वेबसाइटला भेट देऊन सुधारित अभ्यासक्रम पाहू शकतात.

 

परीक्षेच्या पद्धतीनुसार, NEET प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग असतील. विभाग A मध्ये ३५ प्रश्न असतील आणि विभाग B मध्ये १५ प्रश्न असतील, त्यापैकी उमेदवार कोणतेही १० प्रश्न निवडू शकतात. पात्रता परीक्षेत उमेदवारांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. शिवाय, SC, ST आणि OBC-NCL प्रवर्गातील अर्जदारांसाठी किमान गुणांचा निकष ४० टक्के आहे.

CBSE कडून बारावीच्या अकाऊंटन्सी विषयाच्या उत्तरपत्रिकेत महत्वपूर्ण बदल

 

"उमेदवारांनी  NEET (UG)-२०२४ साठी अभ्यास साहित्य तयार करण्यासाठी आणि शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी NEET (UG) परीक्षांसाठी अद्ययावत अभ्यासक्रमाची तयारी करावी, असा सल्ला NMC  ने दिला आहे. MBBS, BDS आणि इतर UG वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET UG २०२४ परीक्षा ५ मे २०२४ रोजी घेतली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतलेली ही सर्वात मोठी परीक्षा आहे.

 

सुधारित अभ्यासक्रम : https://shorturl.at/hOX19

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k