ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणार ; विद्यापीठाकडे निधीची कमतरता नाही: कुलगुरू डॉ.कारभारी काळे

कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (डीबाटू)ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन सुरू केले आहे. पुणे विद्यापीठातही या पद्धतीने ईव्हॅल्युएशन करण्याची प्रक्रिया सुरू करत आहेत.

ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणार ; विद्यापीठाकडे निधीची कमतरता नाही: कुलगुरू डॉ.कारभारी काळे

  एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu) मागील व्यवस्थापन परिषदेने ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनसाठी निधीला मंजुरी दिली आहे. ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन व्यापक पातळीवर करावे लागणार असल्याने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा लागेल.तसेच विद्यापीठाकडे निधीची कमतरता नाही.मात्र, ऑनस्क्रीन व्हॅल्युएशनच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यातील तांत्रिक बाबी तपासव्या लागतील व त्याची पूर्तता करावी लागेल, पुढील दोन-तीन दिवसात हे काम पूर्ण होईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Pune University) कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Vice-Chancellor Dr.karbhari kale) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.

       पुणे विद्यापीठातर्फे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन केले जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली होती.तसेच काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू)ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशन सुरू केले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठातही या पद्धतीने ईव्हॅल्युएशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले होते.तसेच पुढील आठवड्याभरात याबाबतची निविदा काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले ३ एप्रिल रोजी स्पष्ट केले होते .मात्र, अद्याप निविदा प्रसिद्ध झाली नाही. दरम्यान व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांशी संवाद साधला असता अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनबाबत अधिक माहिती देताना डॉ.काळे म्हणाले, विद्यापीठाकडे निधीची कमतरता नसून या पूर्वीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनवर चर्चा झाली होती.तसेच निधीही मंजूर करण्यात आला होता. परंतु, ऑनस्क्रीन ईव्हॅल्युएशनचे काम आता व्यापक पातळीवर केले जाणार असल्याने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा लागेल . तसेच निविदा काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी पुढील दोन-तीन दिवसात पूर्ण केल्या जाणार आहेत.