CBSE Exam 2024 : दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, पुरवणी परीक्षा जुलैमध्ये

यंदाच्या दहावी व बारावी निकालानंतर अनेक विद्यार्थी पुरवणी परीक्षाही देतात. ही परीक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CBSE Exam 2024 : दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, पुरवणी परीक्षा जुलैमध्ये
CBSE 10,12 Exam 2024

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी (10th Result) व बारावी परीक्षांचा निकाल (12th Result) जाहीर करताना पुढील वर्षीच्या परीक्षेच्या (CBSE Exam 2024) तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करता यावे, साठी मंडळाकडून आठ महिने आधीच संभाव्य तारीख जाहीर केली आहे.

यंदाच्या दहावी व बारावी निकालानंतर अनेक विद्यार्थी पुरवणी परीक्षाही देतात. ही परीक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : CBSE Result Update : दहावीत ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्केपेक्षा जास्त गुण

दरम्यान, यंदाचा इयत्ता दहावी परीक्षेचा (10th Result) एकूण निकाल ९३.१२ टक्के इतका लागला आहे. या निकालात तब्बल ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये ५८ विशेष विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी यंदा १.२८ टक्क्यांनी घसरली आहे.

निकालामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२५ इतकी असून मुलांच्या तुलनेत १.९८ टक्केंनी अधिक आहे. परीक्षा दिलेल्या एकूण २१ लाख ६५ हजार ८०७ विद्यार्थ्यांपैकी ४४ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९५ टक्के व त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण नऊ टक्के एवढे आहे. तर १ लाख ९५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण २.०५ टक्के आहे.

विशेष विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार १५४ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार ६२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ९२.६३ एवढी आहे. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच ९० टक्के व त्यापेक्षा अधिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २७८ एवढी आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2