जयंत नारळीकर यांचा गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान

आयआयटी इंदूर येथे झालेल्या एएसआय च्या ४१ व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असला, तरी प्रा. नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. एएसआयचे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी यांनी पुण्यात येऊन प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.

जयंत नारळीकर यांचा गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान
Jayant Narlikar honored with Govind Swaroop Lifetime Achievement Award

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील ‘आयुका’चे (IUCCA) संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर (Jayant Naralikar) हे पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराचे (Govind Swaroop Lifetime Achievement Award) सर्वोत्कृष्ट मानकरी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आयआयटी इंदूर (IIT) येथे झालेल्या एएसआय (ASI) च्या ४१ व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असला, तरी प्रा. नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. एएसआयचे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी (Dipankar Banerjee) यांनी पुण्यात येऊन प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान केला.

वर्ष २०२२ मध्ये, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना, भारतीय खगोलशास्त्र संस्थेने (एएसआय) भारतातील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या  त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल प्रख्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना गौरवण्यासाठी गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली. गोविंद स्वरूप यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या  पुरस्काराला देण्यात आले आहे. पहिल्या जीवन गौरव पुरस्काराप्रित्यर्थ प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देवून डॉ.जयंत नारळीकर यांचा गौरव केला.

हेही वाचा : NCL मध्ये भरणार संशोधन उत्सव; विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा पाहण्याची संधी

याप्रसंगी बोलताना प्रा. बॅनर्जी म्हणाले, "कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भिन्नता असली, तरी प्रा. स्वरूप आणि प्रा. नारळीकर या दोघांनीही खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राच्या वाढीसाठी देशात आदर्श संस्था उभारून आणि तरुण पिढीच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड परिश्रम  घेऊन अमूल्य योगदान दिले. हे दोघे महान संशोधकांनी   भावी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत  कार्य केले आहे, करत आहेत. आमचे लाडके शिक्षक - जयंत सर, यांना हा पुरस्कार सुपूर्द करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.” यावेळी आयुकाचे  संचालक आर. श्रीआनंद उपस्थित होते.

प्रा. नारळीकर यांनी आपले जीवन ब्रह्माण्डाच्या अभ्यासासाठी समर्पित केले आहे. नारळीकर-हॉयल सिद्धांतासह खगोल भौतिकशास्त्राच्या विविध पैलूंमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या लोकप्रिय संवाद कार्यक्रमांतून, वेगवेगळ्या ध्‍वनिचित्रफिती, माहितीपट  आणि पुस्तकातूर प्रोत्साहन दिले आहे. प्रा. नारळीकर हे भारतात विश्वउत्पत्‍ती शास्त्रामध्‍ये  संशोधन सुरू करण्‍यात  अग्रणी  होते. त्यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्र अभ्यासक्रम आणि संशोधनाचा प्रसार  करण्यासाठी एक समर्पित केंद्र तयार करण्याची कल्पना मांडली. त्यांचे हे स्वप्न ‘आयुका’च्‍या  स्‍थापनेच्या रूपातून त्यांनी आपल्‍या परिश्रमाने साकार केले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2