CBSE Result : ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; दहावीचा निकाल शंभर टक्के

समृद्धी कानडे ही विद्यार्थिनी ९८.२ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेतील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी १५ असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ५४ आहे.

CBSE Result : ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; दहावीचा  निकाल शंभर टक्के
CBSE 10th Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

CBSE 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फथ (CBSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (CBSE 10th Result) शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या (Jnana prabodhini Prashala) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या तुकडीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

समृद्धी कानडे ही विद्यार्थिनी ९८.२ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेतील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी १५ असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ५४ आहे. तर ७७ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. संस्कृतमध्ये २५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. तर ८ विद्यार्थ्यांनी गणित विषयात आणि ३ विद्यार्थ्यांनी सामाजिक अध्ययन विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली.

Cहेही वाचा : CBSE Exam 2024 : दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, पुरवणी परीक्षा जुलैमध्ये

प्रशालेतील पहिल्या  पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालले विद्यार्थी : 

समृद्धी कानडे - ९८.२ टक्के
आर्य गुजर – ९८ टक्के
राज निंबाळकर – ९७.८ टक्के
ज्ञानेश्वरी कामठे - ९७.८ टक्के 
उत्कर्षा माने - ९७.६ टक्के

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2