शिक्षक भरती २०२३ : अशी निघणार भरतीची जाहिरात, या गोष्टी आहेत महत्वाच्या

शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी २ लाख १६ हजार उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते.

शिक्षक भरती २०२३ : अशी निघणार भरतीची जाहिरात, या गोष्टी आहेत महत्वाच्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) प्रक्रियेला वेग दिला असून आता जाहिरात काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थापनास पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी २ लाख १६ हजार उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून भरतीसाठी आवश्यक असणारी स्व-प्रमाणपत्रे पूर्ण भरून घेण्यात आली आहेत. या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी जाहिरात देणे आवश्यक आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; लवकरच जाहिराती निघणार, आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

 

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया -

- इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल.

- सुरूवातीला संबंधित व्यवस्थापनास पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सरल प्रणालीतील युझर आयडी हा या पोर्टलचा देखील युझर आयडी असेल.

- जाहिरात देण्यापुर्वी व्यवस्थापनाची बिंदूनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत प्रमाणित केलेल असणे आवश्यक आहे.  एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदूनामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी लागेल.

- रिक्त पदांची मागणी नोंदविताना २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी लागेल.

- इयत्ता सहावी ते आठवी या गटातील भाषा, गणित-विज्ञान, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या प्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल.

- इयत्ता नववी ते दहावी या गटातील भाषा विषय, गणित, विज्ञान, गणित-विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल.

- जाहिरातीसाठी बिंदूनामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल.

जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदूनामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक आहे.

- जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध आहे.

- पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर ही जाहिरात वतर्मानपत्रांमध्ये प्रसिध्द करावी लागेल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://rb.gy/yhkof

पवित्र  पोर्टल - https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k