शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; लवकरच जाहिराती निघणार, आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

सध्यस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची लवकरच प्राप्त होतील. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे

शिक्षक भरती प्रक्रियेला वेग; लवकरच जाहिराती निघणार, आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) प्रक्रियेला आता वेग आला आहे. लवकरच शिक्षक भरतीच्या जाहिराती निघणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. नवीन २०२३ मधील शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा सोमवारपासून (दि. १६) पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.

 

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी शासनाने "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२" या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीस २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे व आतापर्यंत १ लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

दीपक केसरकर : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ६०/ ४० चा फॉर्म्युला ?

 

२३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित

ही चाचणी दिलेल्या उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. केवळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपूर खंडपीठ येथील निर्णय दिलेल्या प्रकरणी कार्यवाही सुरु आहे. नवीन २०२३ मधील शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६ ऑक्टोबर पासून पोर्टलवर सुरु केली आहे. त्यासाठी आवश्यक user manual पोर्टलवर उपलब्ध आहेत. सध्यस्थितीत राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची लवकरच प्राप्त होतील. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे मांढरे यांनी सांगितले.

 

२०१९ मधील शिक्षक पदभरतीबाबत

सन २०१९ मधील शिक्षक पदभरती च्या वेळी अपात्र, गैरहजर रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार यांच्यातून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती सबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना दिनांक २० ऑक्टोबर पासून सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर पोर्टल स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून दिनांक १० नोव्हेंबर पासून प्राधान्यक्रम घेऊन उर्वरित पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा; कायदेशीर लढाई जिंकली

 

सन २०१९ मधील जाहिरातीपैकी १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसह पद भरतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले होते, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याने त्यांना निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर interview result नोंद करण्याची तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट सुविधा उपलब्ध केली आहे.

 

“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" या चाचणीनुसार शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन पोर्टल वरील user manual नुसार कार्यवाही करावी, याबाबत व्यवस्थापनांना अडचण असल्यास edupavitra२०२२@gmail.com या वर संपर्क साधण्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k