भारतीय विद्यार्थ्यांची चांदी; अमेरिकेने यावर्षी दिले विक्रमी व्हिसा

भारतातील इच्छुकांना ९०,००० हून अधिक व्हिसा जारी करण्यात आले आहेत, ज्यांना  आता  यूएसमधून त्यांचे उच्च शिक्षण घेता येईल.

भारतीय विद्यार्थ्यांची चांदी; अमेरिकेने यावर्षी दिले विक्रमी व्हिसा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

अमेरिकेने (Ameria) भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) यावर्षी विक्रमी संख्येने व्हिसा (Visa) जारी केल्याची माहिती अमेरिकेच्या भारतातील दुतावासाने (US Embassy) जाहीर केली आहे. अमेरिकेने तब्बल ९० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. यूएस मिशनने (US Mission) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी  जून ते ऑगस्ट दरम्यान अमेरिकेने जगभरात जारी करण्यात आलेल्या चारपैकी एक व्हिसा भारतीय विद्यार्थ्यासाठी  होता.

 

अमेरिकेने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भारतातील विद्यार्थ्यांना विक्रमी संख्येने व्हिसा जारी केले आहेत. भारतातील यूएस मिशनने एक्स अकौंटवरवर जाहीर केले की, भारतातील इच्छुकांना ९०,००० हून अधिक व्हिसा जारी करण्यात आले आहेत, ज्यांना  आता  यूएसमधून त्यांचे उच्च शिक्षण घेता येईल. अमेरिकेने या सत्रासाठी अर्ज स्वीकारणे थांबत ही आकडेवारी जाहीर केली आहे.  

तलाठी, पोलीस भरतीला स्थगिती मिळणार? उच्च न्यायालयात याचिका दाखल

 

भारतीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, यूएस मिशनने म्हटले आहे की, "आपल्या उच्च शिक्षणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी युनायटेड स्टेट्सची निवड करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. टीमवर्क आणि नाविन्यतेमुळे आम्ही पात्र विद्यार्थी वेळेत पोहचतील याचा विश्वास दिला." 

 

दरम्यान, मागील वर्षी भारतातील तब्बल सव्वा लाख विद्यार्थ्यांना व्हिसा जारी करण्यात आला होता. कोणत्याही देशापेक्षा हा आकडा सर्वाधिक आहे. २०२३ मधील आकडेवारीनुसार सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या जगभरातील विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j