फेलोशिपमध्ये घसघशीत वाढ; 'युजीसी'ने चार वर्षांनंतर घेतला निर्णय

जेआरएफमध्ये सहा हजारांची तर एसआरएफमध्ये सात हजारांची वाढ करण्यात आल्याचे पत्रक युजीसीने प्रसिद्ध केले आहे.

फेलोशिपमध्ये घसघशीत वाढ; 'युजीसी'ने चार वर्षांनंतर घेतला निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) पाठ्यवृत्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती (JRF) आणि वरिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीच्या (SRF) रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये वाढ करण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जानेवारी २०२३ या तारखेपासून होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. (UGC Fellowship Scheme)

 

जेआरएफमध्ये सहा हजारांची तर एसआरएफमध्ये सात हजारांची वाढ करण्यात आल्याचे पत्रक युजीसीने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आतापर्यंत विज्ञान, मानव्यता आणि समाजशास्त्र या शाखांमध्ये संशोधन करण्यासाठी यूजीसीकडून ही पाठ्यवृत्ती दिली जाते.

UGC India : आता ‘युजीसी’चे प्रत्येक महत्वाचे अपडेट मिळणार थेट तुमच्या मोबाईलवर

 

जेआरएफसाठी प्रति महिना ३१ हजार रुपये फेलोशिप दिली जात होती. आता ही रक्कम ३७ हजार रुपये करण्यात आली आहे. तर एसआरएफची रक्कम आता सात हजार रुपयांनी वाढवून ४२ हजार करण्यात आली आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप योजनेअंतर्गतही ही फेलोशिप रक्कम दिली जाणार आहे.

 

डॉ. डी. एस. कोठारी पोस्ट डॉक्टरल फेलोशिपच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. हायर पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची रक्कम ५४ हजारांवरून ६७ हजार करण्यात आली आहे. तर पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची रक्कम पहिल्या वर्षासाठी १० हजार रुपयांनी, दुसऱ्या वर्षासाठी १२ हजार तर तीन वर्षांसाठी १३ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. महिला, एससी व एसटी आणि डॉ. राधाकृष्णन पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठीच्या रकमेतही याप्रमाणेच वर्षनिहाय वाढ करण्यात आली आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k