पीएमश्री केंद्रीय विद्यालयात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात साजरा

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करत तसेच विद्यार्थ्यांना टिळा आणि औक्षण करून त्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत केले.

पीएमश्री केंद्रीय विद्यालयात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात साजरा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन (PM Shri Kendriya Vidyalaya No 2) याठिकाणी बालवाडी (Kindergarten) व इयत्ता पहिली(Class I) च्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा (welcome ceremony) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करत तसेच विद्यार्थ्यांना टिळा आणि औक्षण करून त्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत (welcome) केले.

या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य भारत भूषण (Principal Bharat Bhushan) यांनी दीप प्रज्वलन करून केली. त्यानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थी आणि पालकांना मंत्रमुग्ध केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुमार पाटील (Principal Sanjay Kumar Patil) यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार राबविण्यात येणाऱ्या शिक्षण प्रणाली विषयी माहिती दिली. तसेच पालकांना विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कशा प्रकारे काम केले जाते याविषयीची माहिती दिली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या अखेरीस नव्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.