NCERT ची सहावीची नवीन पुस्तके बाजारात; भारतीय लेखकांचा आणि संस्कृतीचा समावेश

इयत्ता सहावीतील इंग्रजीच्या नवीन पुस्तकाचे नाव 'पूर्वी' असे ठेवण्यात आले असून त्यात बदल करण्यात आले आहेत.

NCERT ची सहावीची नवीन पुस्तके बाजारात; भारतीय लेखकांचा आणि संस्कृतीचा समावेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (NCERT) इयत्ता सहावीतील (6th standard) काही विषयांची नवीन पुस्तके (new books) बाजारात दाखल झाली आहेत. शाळा सुरू होऊन सुमारे दोन महिने उलटले आहेत. त्यानंतर ही पुस्तके बाजारात आल्यामुळे नाराजी असली तरी या नवीन पुस्तकांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. इयत्ता सहावीतील इंग्रजीच्या नवीन पुस्तकाचे नाव 'पूर्वी' (Purvi) असे ठेवण्यात आले असून त्यात  बदल करण्यात आले आहेत. ही नवीन पुस्तके राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कनुसार (NCF 2023)तयार केली आहेत .

बदलाचा विचार केला तर, जुन्या पुस्तकात परदेशी लेखकांच्या कथा होत्या. तर या नव्या पुस्तकात भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यावर भर देण्यात आला आहे. त्याचवेळी, इयत्ता 6 मधील नवीन NCERT इंग्रजी पुस्तकातील बहुतेक कथा भारतीय लेखकांच्या आहेत. त्या भारतीय पर्यावरणावर आधारित आहेत. पूर्वीच्या पुस्तकात परदेशी लेखकांच्या 8 कविता होत्या. तर नवीन पुस्तकात ५ विदेशी कवितांचा समावेश आहे. बाकी सर्व कथा आणि कविता भारतीय लेखकांनी लिहिल्या आहेत. यामध्ये सुधा मूर्ती (Sudha Murthy) आणि एसआय फारुकी (SI Farooqui) यांसारख्या लेखकांच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे.

'हेल्थ अँड वेलनेस' (Health and Wellness) नावाचा एक अध्याय आहे. ज्यामध्ये योगाचेही स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पुस्तकात प्रथमच 'इंडिया' हा शब्द वापरण्यात आला आहे. 'संस्कृती आणि परंपरा' या शीर्षकाच्या अध्यायात 'भारत' आणि 'इंडिया' हे दोन्ही शब्द वापरले आहेत. 

या शिवाय पुस्तकात  'Spices that Heal us' या शीर्षकाचा एक विभाग आहे, ज्यामध्ये मसाल्यांचा वापर केवळ अन्नातच नव्हे तर औषध म्हणूनही केला जाऊ शकतो. हे सांगितले आहे. 

दरम्यान, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित या विषयांची पुस्तके अद्याप बाजारात आलेली नाहीत. यावर्षी NCERT NCF 2023 च्या शिफारशींच्या आधारे इयत्ता तिसरी आणि सहावीची पुस्तके बदलत आहे. इयत्ता तिसरीची पुस्तके एप्रिल-मे महिन्यात आली पण सहावीचे पहिले पुस्तक फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये आले आहेत. इतर विषयांची पुस्तके तयार होईपर्यंत शाळांना 'सेतू कार्यक्रमा'द्वारे शिकवण्यास सांगण्यात आले आहे.